राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ‘भटक्या विमुक्त जाती व जमाती विभागाच्या’ “दक्षिण विधानसभा अध्यक्षपदी” अनिल बापू पुजारी यांची निवड !

कोल्हापूर –
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भटक्या विमुक्त जाती व जमाती विभागाच्या दक्षिण विधानसभा अध्यक्षपदी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल बापू पुजारी यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए.वाय पाटील साहेब व पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे दादा यांच्या शुभास्ते व भटक्या विमुक्त जाती व जमाती चे जिल्हाध्यक्ष कृष्णात पुजारी यांच्या उपस्थितीत अनिल पुजारी यांना निवडीचे हे पत्र देण्यात आले आहे. जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात आणि विचारात घेऊनच ही निवड करण्यात आली आहे.
अनिल पुजारी हे धनगर – बहुजन समाजात, अलुतेदार आणि बलुतेदार वर्गात, भटके-विमुक्त आणि भटक्या जाती – जमाती, अशा विविध वर्गात व तळागाळातल्या जनतेमध्ये राहून गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत. त्यांच्या अडी – अडचणी सोडवत आहेत. त्यामुळे दांडगा जनसंपर्क हे त्यांच्या नेतृत्वाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. नेतृत्व, कर्तुत्व, दातृत्व आणि वक्तृत्व अशा सर्वच पातळ्यांवर पुजारी यांचा बोलबाला आहे. त्यामुळे त्यांच्या अंगी असलेले हे विविध गुण ओळखूनच पक्षाने त्यांच्यावरती, ही मोठी जबाबदारी सोपविली आहे.
निवडीनंतर बोलताना ते म्हणाले की, पक्षाने आपल्याला काम करण्याची चांगली संधी दिली आहे. त्याबद्दल मी पक्षाचा व पक्षातील सर्व वरिष्ठ नेतेमंडळी, विशेषता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांचा तसेच इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांचा आभारी आहे. यापुढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा मा. शरदचंद्रजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार साहेब, मा. खा सुप्रियाताई सुळे मा. ना. जयंत पाटील साहेब, मा. ना. छगन भुजबळ साहेब, त्याशिवाय भटक्या विमुक्त जाती व जमाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा. हिरालाल राठोड साहेब, पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. ए. वाय पाटील साहेब, जिल्हा कार्याध्यक्ष, अनिल साळोखे तसेच विभागाचे जिल्हाध्यक्ष कृष्णात पुजारी यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करेन आणि भटक्या-विमुक्तांच्या व गोरगरिबांच्या, अलुतेदार – बलुतेदार वर्गाच्या, सर्व गोरगरीब जनतेच्या या माध्यमातून अडचणी सोडवण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करेन.