आदमापूर येथे १३३ नागरीकांची रॕपिड ॲन्टिजेन टेस्ट; दोन पाॕझिटिव्ह

मुदाळतिट्टटा प्रतिनिधी :
भुदरगड तालुक्यात कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून भुदरगड तालुक्यातील गावागावातून आरोग्यविभागाकडून रॕपिड ॲन्टिजेन टेस्ट केली जात आहे.त्यानुसार आदमापूर ( ता.भुदरगड ) येथील दूधसंस्थां,रेशनधान्य दुकान,किराणा दुकाने, बांधकाम करणारे कामगार तसेच बाळुमामा देवस्थानातील कामगार अशा गर्दीची ठिकाणे असणाऱ्या १३३ नागरीकांची मडिलगे प्राथमिक आरोग्यविभागाकडून रॕपिड ॲन्टिजेन टेस्ट घेणेत आली.पैकी दोन नागरिक पाॕझिटिव्ह आले.
यावेळी तहसीलदार अश्विनी वरोटे- आडसूळ,तालुका आरोग्यअधिकारी डाॕ.सचिन यत्नाळकर यांनी भेट देऊन गर्दीच्या ठिकाणी असलेल्या सर्व नागरिकांची तपासणी करणेचे आदेश दिले.
यामध्ये मडिलगे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकिय अधिकारी डाॕ.ज्ञानेश्वर हावळ यांंच्यामार्गदर्शनाखाली आरोग्यसेवक सागर नाईक आरोग्यसेविका एच.बी.मुजावर,एस,एस.पाटील,समुदाय वैधकिय अधिकारी हर्षवर्धन चौगुले कविता कांबळे,संगीता पाटील,लता गोडसे मदतनिस – ए.बी.जाधव ,अरविंद पाटील, आदिंनी तपासणीचे काम पाहिले.
याप्रसंगी ,पोलिस पाटील माधुरी पाटील ,ग्रामसेवक दत्तात्रय माने,उपसरपंच राजनंदिनी भोसले,गणेश खेबुडे,विनायक पाटील आदी उपस्थित होते.