जीवनमंत्रताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

सरवडे येथील किसनराव मोरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी राजवर्धन दिपक भोसले यांस ‘महाराष्ट्राचा स्मार्ट महावक्ता पुरस्कर 2021’ प्राप्त

बिद्री प्रतिनिधी :

सरवडे ता. राधानगरी येथील किसनराव मोरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता ९ वी चा विद्यार्थी कु. राजवर्धन दिपक भोसले यांस केइएस सामाजिक संस्था, यवतमाळ यांच्या वतीने वक्तृत्व क्षेत्रात दिला जाणारा मानाचा ‘महाराष्ट्राचा स्मार्ट महावक्ता पुरस्कर 2021’ प्राप्त झाला.

वक्तृत्वासाठी आवश्यक आवाजातील आरोह- अवरोह, मुद्देसुत मांडणी, वैचारिक प्रगल्भता, सादरीकरणाची कला या कौशल्यांचा जोरावर राजवर्धन ने आजवर १०० पेक्षा अधिक वक्तृत्व स्पर्धेत यश मिळविले आहे. यात मावळ प्रतिष्ठान कोल्हापूर, कृषी पदवीधर संघटना बारामती, स्टार अकॅडमी कोल्हापूर, ज्ञानदा वाचनालय जरळी, ज्ञान प्रबोधिनी स्कुल बाचणी, मगदूम हायस्कूल कसबा सांगाव, जीत फाउंडेशन नरंदे, स. ब. खाडे हायस्कूल सांगरूळ,महावीर कॉलेज कोल्हापूर, हनुमान हायस्कूल इस्पुर्ली,युवा जागर, डोंगळें प्रतिष्ठान घोटवडे,जयसिंगराव घाटगे कागल,बळवंतराव यादव पेठवडगाव, जैन बोर्डिंग कोल्हापूर, पंढरपूर समिती, इंदापूर वाचनालय, भीमक्रांती मंडळ ममदापूर,शिवाजी पेठ कोल्हापूर, गुरुकुल विद्यालय पेठवडगाव,माले वाचनालय,अरुणोदय चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ, अशोकराव माने ग्रुप वाठार, रसिक रंजन वाचनालय घुणकी, वेदांते प्रतिष्ठान कुरुकली या व अनेक ऑनलाईन स्पर्धेत सहभाग नोंदवून यश प्राप्त केले.

कोल्हापूर जिल्ह्यात राजवर्धन याची ‘वक्तृत्वाचा चेहरा’ अशी ओळख बनली आहे. त्यास सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. टी. ए. मगदूम व आदर्श मार्गदर्शक पुरस्कार विजेते प्रा. अतुल कुंभार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आजवर ३०० पेक्षा अधिक वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवले आहे. या सर्वांना संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह मोरे, प्राचार्य पी.एस.पाटील, उपप्राचार्य ए. बी. सावंत, पर्यवेक्षक डी.एम टिपूगडे,क्रीडाशिक्षक व्ही. व्ही. मोरे व संस्था पदाधिकारी यांचे प्रोत्साहन लाभले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks