जीवनमंत्रतंत्रज्ञानमहाराष्ट्र

कौशल्य विकास सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास परवानगी

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

जिल्ह्यात महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटी, मुंबई अंतर्गत सूचीबध्द प्रशिक्षण संस्थांकडून देण्यात येणारे कौशल्य प्रशिक्षण सुरु करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी खालील अटी व शर्तीस अनुसरुन परवानगी दिली आहे.
१) मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण संस्था सुरु करण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे.
२) कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेश द्वारावर उपस्थित प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अनिवार्यतेने थर्मल स्क्रिनिंग करण्यात यावे. तसेच प्रत्येक वर्गखोली हवेशीर व 50 टक्के पेक्षा कमी आसन क्षमतेने वापरावी.
३) कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेमध्ये उपस्थित प्रत्येक प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तीन पदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क किंवा रुमाल अथवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक राहील.
४) कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कुटूंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार योग्य ते शारिरीक अंतर राखण्याबाबतचा नियम काटेकोरपणे पाळण्यात यावा.
५) ताप, सर्दी, खोकला इ. कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश देण्यात येवू नये.
६) शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2020/प्र.क्र.140/एसडी-6, दिनांक 10/11/2020 रोजीच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील.
७) एकमेकांच्या वस्तू उदा. पेन, मोबाईल व इतर शैक्षणिक साहित्य एकमेकांनी हाताळू नयेत.
८) कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांचे प्रवेशद्वार, बैठक कक्ष, बाथरुम, प्रसाधनगृह येथे हात धुण्याकरिता पुरेशा प्रमाणात साबण व सॅनिटायझर्स उपलब्ध करुन देण्यात यावेत. तसेच प्रशिक्षणाचे ठिकाण दररोज निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
९) सर्व कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांनी आवश्यक तेथे सर्व सैध्दांतिक प्रशिक्षण हे ऑनलाईन प्रशिक्षण माध्यमाद्वारे आयोजित करावे व प्रात्यक्षिक प्रशिक्षण संस्थंमध्ये आयोजित करावे. यासाठी प्रशिक्षणार्थ्यांचे गट (Batches) निर्माण करावे.
१०) कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेमधील सर्व खोल्यांचे 1 टक्का सोडीयम हायपोक्लोराईड वापरुन दररोज निर्जंतुकीकरण करण्यात यावे. तसेच प्रत्येक तासिकेनंतर वर्ग खोली व आसन व्यवस्था निर्जंतुक करण्यात यावी.
११) सर्व 18 वर्षांवरील पात्र प्रशिक्षणार्थ्यांचे जिल्हा लसीकरण अधिकारी तसेच स्थानिक प्रशासनाशी संपर्क करुन आठ दिवसाच्या आत प्राधान्याने लसीकरण करुन घेण्यात यावे.
१२) कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांमधील सर्व अधिकारी, कर्मचारी व निदेशकांचे प्रथम प्राधान्याने दोन्ही डोसचे लसीकरण करुन घेणे तसेच कोविड-19 चाचणी करणे बंधनकारक आहे.
१३) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांचेकडील जा. क्र. MSSDS/PFI/B-16/2020-21/1203, दि. 10/08/2021 रोजीच्या परिपत्रकासोबत देण्यात आलेल्या प्रशिक्षण संस्थेद्वारे कोविड-19 संसर्गाचा प्रार्दुभाव रोखण्याकरीता मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
१४) या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks