राजशेखर मोरे कुटुंबीयाना हसनसो मुश्रीफ फौंडेशनच्या वतीने मदत…

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर,कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामध्ये कार्यरत असणारे राजशेखर मोरे रा.राजाराम चौक, टिंबर मार्केट, कोल्हापूर हे आपले कर्तव्यावर असताना माजलगाव, जि. बीड येथे धरणामध्ये मृत्यू पावलेले डॉक्टरांचे प्रेत मिळत नसल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने त्या ठिकाणी ते प्रेत काढण्याकरता गेले असता मृतदेह शोधताना मच्छीमारांनी लावलेल्या जाळ्यामध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाले.
आज पर्यंत राजशेखर मोरे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मध्ये कार्यरत असताना शेकडो प्रेत पाण्याखाली किंवा बुडालेले, दरीत पडलेले काढण्यामध्ये त्यांना यश आले होते, पण यावेळी दुर्दैवी त्यांचा अंत झाला त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी, लहान मुलगा असे कुटुंब आहे. बीड जिल्ह्यामध्ये तिथल्या लोकांनी त्यांना मदत म्हणून जवळजवळ २५/३० लाख रुपये मदत म्हणून देण्यात आले. त्याच धर्तीवर कोल्हापूर मध्ये देखील अश्या जीवरक्षक, प्रामाणिक माणसाच्या कुटुंबियांना मदत म्हणून माजी ग्रामविकास व कामगार मंत्री आ.हसनसो मुश्रीफ साहेबांनी आ.हसनसो मुश्रीफ फौंडेशनच्या वतीने मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष श्री नवीन मुश्रीफ यांच्या हस्ते एक लाख रुपयाचे छोटीशी मदत म्हणून धनादेश देऊन प्रयत्न केला व भविष्यात देखील त्यांच्या कुटुंबीयाच्या पाठीशी राहण्याचे ग्राही दिली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पवार, राजेश लाटकर, उत्तम कोराणे, युवराज साळोखे, सतिश लोळगे, रामचंद्र भाले, महेश सावंत, चेतन मोहिते, वहिदा मुजावर, मिनाक्षी डोंगरसाने, संजय कुराडे, सुहास साळोखे, सुनील देसाई व इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.