ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगुड : कै.सौ. सुलोचनादेवी विश्वनाथराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने बांधकाम कामगारांना सुरक्षा संच वाटप

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ व कामगार कर्मचारी यांच्या सहकार्याने तसेच कै.सौ. सुलोचनादेवी विश्वनाथराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने सहाशे बांधकाम कामगारांना सुरक्षा पेटी वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. या अभियानात एक हजार जणांची नोंदणी झाली असून त्याचा शुभारंभ मुरगुड चे युवा नेते दिग्विजयसिंह प्रविणसिंह पाटील तसेच युवा नेते सत्यजितसिंह अजितसिंह पाटील यांच्या हस्ते पार पडला. सदर सुरक्षा पेटीत चौदा प्रकारचे साहित्य असून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्या सहकार्याने व मुरगुड शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश रामाणे यांचेवतीने हा लाभ देण्यात आला.

सुरक्षा साधना भावी कामगारांची मृत्यू प्रमाण अधिक असल्याने सुरक्षा भेटीला महत्त्व आहे. या बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजना देखील देण्यात येणार आहे असे युवा नेते दिग्विजयसिंह पाटील यांनी बोलताना सांगितले. सुरक्षा किट मध्ये सुमारे अकरा हजार रुपयांच्या साहित्याचे वाटप करण्यात आले या अभियानात नोंदणी झालेल्या १००० जणांना कार्यक्रम घेऊन सुरक्षा संच वाटप करून आणखी योजनाचा लाभ देणार असल्याचे पाटील म्हणाले

या कार्यक्रमास युवा नेते सत्यजितसिंह पाटील ,अँड सुधीर सावर्डेकर ,नगरसेवक राहुल वंडकर ,मुरगूड शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश रामाणे ,प्रणव रामाणे ,विशाल मडीलगेकर यांचेसह पुरुष व महिला बांधकाम कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks