क्रीडाजागतिकताज्या बातम्या

PAK vs NZ T20 Semi Final: पाकिस्तान वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये, न्यूझीलंडवर मोठा विजय

PAK vs NZ T20 Semi Final: नशिबाने मिळालेल्या संधीच पाकिस्तानने सोनं केलं.

सिडनी:

पाकिस्तान टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. आज न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये वर्ल्ड कपची सेमीफायनल झाली. पाकिस्तानने या मॅचमध्ये न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला. न्यूझीलंडची टीम ग्रुप 1 मध्ये टॉपवर होती. या टीमने फक्त एक मॅच गमावली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात न्यूझीलंडच पारड जड समजल जात होतं.

महत्त्वाच्या सामन्यात खेळ उंचावला

पण प्रत्यक्षात असं काही घडलं नाही. पाकिस्तानने न्यूझीलंडवर 7 विकेट राखून विजय मिळवला. विजयासाठी दिलेलं 153 धावांच लक्ष्य आरामात पार केलं. मोहम्मद रिजवान आणि कॅप्टन बाबर आजम यांची जोडी टी 20 वर्ल्ड कपमध्ये सातत्याने अपयशी ठरली होती. पण आज मात्र त्यांनी महत्त्वाच्या सामन्यात आपला खेळ उंचावला.

रिजवान-बाबरची जबरदस्त पार्टनरशिप

153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बाबर आणि रिजवानने 105 धावांची खणखणीत सलामी दिली. बाबर आजम बाद होणारा पाकिस्तानचा पहिला फलंदाज ठरला. त्याने 42 चेंडूत 53 धावा केल्या. यात 7 चौकार होते. मोहम्मद रिजवानने 43 चेंडूत 57 धावा फटकावल्या. यात 5 चौकार होते. मोहम्मद हॅरिस 30 रन्सवर आऊट झाला. शान मसूद आणि इफ्तिखार अहमदच्या जोडीने विजयावर शिक्कामोर्तब केलं.

पाकिस्तानच्या विजयाच श्रेय गोलंदाजांना-

पाकिस्तानच्या विजयाच श्रेय गोलंदाजांना जातं. त्यांनी आज न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. फिन एलन आणि डेवॉन कॉनवे हे फॉर्ममध्ये असलेले फलंदाज लवकर बाद झाले. कॉनवे 21 धावांवर रनआऊट झाला. फिनने 4 धावा केल्या. कॅप्टन विलियम्सन 46 आणि डॅरेल मिचेलच्या हाफ सेंच्युरीच्या बळावर न्यूझीलंडने 4 बाद 152 धावा केल्या.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks