ताज्या बातम्यामहाराष्ट्र

करवीर विधानसभा  मतदार संघात विकास कामांचे पर्व  उभारू : जिल्हा परिषदेचे सदस्य राहूल पाटील यांचे प्रतिपादन

सावरवाडी प्रतिनिधी :

डोंगरी भागाच्या विकासासाठी आमदार पीएन पाटील यांच्या आर्थिक फंडातून निधी खर्च केला जात आहे . कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या हिताकरिता विविध विकास कामांचे पर्व उभारु असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कॉग्रेस सदस्य राहूल पाटील यांनी केले 

                  बहिरेश्वर ( ता. करवीर ) येथे आमदार .पीएन पाटील यांच्या २५१५ फंडातून सुमारे दहा लाख रुपयेच्या विविध विकास कामांच्या आयोजित उद्घघाटन कार्यक्रमात ते बोलत होते – अध्यक्षस्थानी सरपंच युवराज दिंडे होते .

                    यावेळी बोलतांना जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष सातपुते म्हणाले  जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तळागाळापर्यत शासकिय निधीतून विकास कामे केली जात आहे आमदार पीएन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांना प्राधान्य देण्यात येते .

                 कार्यक्रमात सरपंच युवराज दिंडे ,माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, करवीर पंचायतीचे उपसभापती अविनाश पाटील आदिची भाषणे झाली . यावेळी कार्यक्रमास करवीर पंचायत  सदस्या अर्चना खाडे , कुंभी कासारीचे माजी संचालक सिताराम पाटील, कॉग्रेस नेते रघुनाथ वरुटे ,यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थितीत होते .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks