ताज्या बातम्यामहाराष्ट्र
राधानगरी : गव्याच्या हल्यात महिला जखमी

राधानगरी प्रतिनिधी :
राधानगरी येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयापासून हाकेचा अंतरावर कृषी चिकित्सालय आहे. येथील फलरोपांच्या भांगलणीचे काम करणाऱ्या महिलांवर झुडपात लपलेल्या गव्याने हल्ला केला. या हल्ल्यात फेजीवडे पैकी लोंढेवाडी येथील महिला केराबाई लक्ष्मण पोकम (वय ४५) ह्या गंभीर जखमी झाल्या.
हत्तीमहाल परिसरात कृषी विभागाच्या कार्यालयाजवळ कृषी चिकित्सालय आहे. या चिकित्सालयात आंबा, काजू, पेरू, नारळ आदींसह विविध फळझाडांच्या रोपांची लागवड केली जाते. कृषी चिकित्सालयाच्या या प्रकल्पावर मजुरीवर काम करणाऱ्या चार महिला आज (दि.१५) गुरुवारी आल्या होत्या. दरम्यान, झुडपात असणाऱ्या गव्याने या महिलांवर अचानक हल्ला केला.