ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राधानगरी : बरगेवाडी येथे कोविड लसीकरन

राधानगरी प्रतिनिधी :

जागतिक महामारी कोरोना या रोगाशी लढा देण्यासाठी शासनस्तर व आरोग्यविभाग यांच्या कडून टप्याटप्याने कोरोना लस देण्यात येत आहे. त्यामध्ये आज राधानगरी तालुक्यातील बरगेवाडी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र ठिकपूर्ली उपकेंद्र कौलव यांचेकडून कोरोनाचे सर्व नियम पाळत लसीकरनास प्रारंभ झाला.
बरगेवाडी येथील मसलिग मंदीर येथे गावातील वयोगट ४५ वर्षा वरील गटातील महिला आणि पुरुष लाभार्थी यांना लस देण्यात आली
रुग्णालयाकडून कोविड लसीकरणासाठी नीटनेटके नियोजन करण्यात आले असून कोरोनाचे काटेकोर नियम पाळत कामकाज सुरू आहे. आरोग्य विभागामार्फत डॉक्टर तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ मोरे. डॉ लता प्रधान आरोग्य सेवक आनंदा बरगे आर .डी .मोरे आरोग्य सेविका बोलाईकर तसेच दिव्यांग संघटनेचे समन्वयक अजित बरगे सर्व आशा अंगणवाडी सेविका आदी परिश्रम घेत आहेत.तरी गावातील ४५ वरील वयोगटातील सर्व लाभार्थी यांनी लस घ्यावी असे आवाहन आरोग्य सेवक आनंदा बरगे यांनी केले आहे

यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण कुमार डोंगळे यांनीही बरगेवाडी लसीकरण केंद्रावर लस घेतली.
यावेळी बरगेवाडी ग्रामपंचायतचे प्रशासक एन आर जमदाडे ग्रामसेवक सुरेश ढेरे सकाळचे पत्रकार सुहास जाधव तसेच ग्रा प . बरगेवाडी चे माजी सरपंच, सदस्य इतर ग्रामस्थ उपस्थित होते

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks