National Student Security Scheme : 1 ली ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजना

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सदरची योजना इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंत शिकणा-या सर्व मुला / मुलींना लागू राहील. इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजना | National Student Security Scheme महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन अंतर्गत लागू केली आहे.
वाढलेली महागाई व विद्यार्थ्यांचे अपघाताचे वेगवेगळे स्वरूप या अनुषंगाने सर्व बाबींचा विचार करून महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
1 ली ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजना | National Student Security Scheme अंतर्गत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास एक लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. अपघातामुळे विद्यार्थ्यांना कायमचे अपंगत्व (दोन अवयव/ दोन डोळे किंवा एक अवयव व एक डोळा निकामी) झाल्यास एक हजार ते पन्रास हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान.
अपघातामुळे कायमचे अपंगत्व (एक अवयव किंवा एक डोळा कायम निकामी) आल्यास 50 हजार रुपयांचे अनुदान, विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा जास्तीत जास्त 10हजार रूपये अनुदान. “राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजना | National Student Security Scheme”
विद्यार्थी आजारी पडून सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास एक लाख रूपयांचे अनुदान तसेच विद्यार्थी कोणत्याही कारणाने (क्रीडा स्पर्धेत खेळताना, शाळेतील जड वस्तू पडून, आगीमुळे, विजेचा धक्का, वीज अंगावर पडून) जखमी झाल्यास प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा जास्तीत जास्त 10हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजना
free fin mnda – mcda Insurance Powered By
आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्याना आरोग्य, जीवन आणि शिक्षणामध्ये आर्थिक सुरक्षा देण्यासाठी “ राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजना” सुरू करण्यात आली आहे. तसेच अपघातामुळे नुकसान होण्याच्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्यास सुरक्षा कवच देण्याकरिता राज्यातील ३ ते १८ या वयोगटातील शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना लागू करण्यात येत आहे. यामध्ये शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग व खाजगी शिक्षण संस्था अशा सर्व विभागाच्या अखत्यारीतील सर्व मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत, प्रत्येक विद्यार्थ्यास अवघ्या 30रु.मध्ये वार्षिक 1 लाखाचं विमा संरक्षण मिळणार आहे.
“राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजना” राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यास आरोग्य, जीवन आणि शिक्षणामध्ये आर्थिक सुरक्षा प्रदान करेल भारत देशाचे उज्ज्वल भविष्य हे देशाच्या युवक वर्गावर निर्भर आहे आणि म्हणूनच “ राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजना” संपूर्ण महाराष्ट्रातील विदयार्थींना शाळेत अथवा कौशल्य विकास संस्थेत शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे.
शिक्षणासोबत शारीरिक स्वास्थ्य उत्तम असणे फार आवश्यक आहे यासाठी विमा योजना 365 दिवसातील २४ तासही लागू राहील म्हणजेच विद्यार्थ्यास कधीही अपघात झाल्यास किंवा आजारपण आल्यास विद्यार्थी विमा दाव्यासाठी पात्र असतो.
सर्व विद्यार्थी सुरक्षा योजना वैशिष्ट्ये
३ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी
विमा
विद्यार्थ्यांसाठी रु.१ लाख वैयक्तिक अपघात विमा.
विद्यार्थ्यांसाठी रु. ५० हजार पर्यंत कायमस्वरूपी संपूर्ण किंवा कायमस्वरुपी अर्ध अपंगत्व विमा.
विद्यार्थ्यांसाठी अपघाती वैद्यकिय खर्च रू. १० हजार,विद्यार्थ्यांची सायकल चोरीला गेल्यास किंवा अपघाताने सायकलचे नुकसान झाल्यास रू. २ हजार,विद्यार्थ्याचे शाळेचे दप्तर चोरीला गेल्यास रू. ५०० ₹,
इत्यादी विमा कवच
वाहन अपघात, शाळेत खेळताना, झाडावरून, जिन्यावरून पडलेने किंवा इतर अनुशंगिक कारणाने हातापायास इजा झालेस, सर्पदंश, पाण्यात पडलेने, शॉर्ट सर्कीट, विषबाधा, विद्युत वाहनी तुटल्याने मृत्यु किंवा इतर अनुशगिंक इजा या बाबी समाविष्ट असतील.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांनी व शाळेनीं आपल्या मुलामुलींच्यासाठी लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र एनजीओ समिती राज्याध्यक्ष युवराज येडूरे यांनी केले आहे.या बैठकीसाठी महाराष्ट्र एनजीओ समिती संपर्कप्रमुख संदिप बोटे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदिप सरदेसाई यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.