ताज्या बातम्या
कौलव येथे कोवीड योद्ध्यांचा सत्कार

कौलव प्रतिनिधी :
देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजपा सरकारला सात वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय जनता पक्षाने कोविडच्या पार्श्वभूमीवर सेवा हेच संघटन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत आज प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कौलव, ता. राधानगरी येथे राधानगरी तालुका उपाध्यक्ष सुभाष पाटीलकौलवकर आणि भाजप युवा मोर्चा जिल्हा कार्यकारणी सदस्य दिपक पाटील कौलवकर यांच्या हस्ते येथील आरोग्य अधिकारी डॉ लता प्रधान आरोग्य सेवक आनंदा बरगे, आशा सेविका तसेच परिचारिका या कोविडयोद्धाचां प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करणेत आला, यावेळी ग्रामपंचायत सदस्य डी जी पाटील व एम डी सुतार, बी न्यूज चे रिपोर्टर बंटी पाटील आदिसह गावातील नागरिक उपस्थित होते.