ताज्या बातम्यामहाराष्ट्र
प्रा. शिवाजी खतकर यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक बँक शाखा गारगोटी शाखेच्या स्वीकृत सदस्य पदी निवड.

मुदाळ प्रतिनिधी :
मुदाळ ( ता.भुदरगड )येथील श्री. परशराम बाळाजी पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व दै. पुण्यनगरीचे पत्रकार शिवाजी दिनकर खतकर यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्था कोल्हापूर गारगोटी शाखेच्या स्वीकृत सदस्य सदस्य पदी निवड झाली.
त्यांना पतसंस्थेच्या व्यवस्थापन कमिटी कडून निवडीचे पत्र मिळाले.
त्यांना माजी आम.व बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन के .पी. पाटील ,उपाध्यक्ष एस. एस. पाटील,खजानीस व गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील’,सचिव विकास पाटील,शिक्षक नेते दादासाहेब लाड,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष एम .एस .पाटील.मुख्याध्यापक एस .एम. पाटील, सुपरवायझर एस. व्ही. रणदिवे , ए एस कळंत्रे, यांची प्रेरणा मिळाली.