लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्यच्या उपाध्यक्ष पदी श्री.दिगंबर टिपूगडे यांची निवड

धामोड प्रतिनिधी : प्रतिश पाटील
संपूर्ण भारतभर ग्राहक संरक्षणाचे काम करत असलेल्या लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्यच्या कार्यकारिणीमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावत असलेल्या श्री.दिगंबर टिपूगडे यांची उपाध्यक्ष या पदावर निवड झाल्याचे अध्यक्ष श्री.दिनकर आमकर व सरचिटणीस श्री.प्रशांत हिंगणे यांनी पत्राद्वारे कळविले.
लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था ही एक रजिस्टर्ड संस्था असून ती ग्राहकांच्या हिताचे काम पाहते. या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर असून विविध उपक्रमाने या संस्थेचे कार्य चालते. सध्या विद्या मंदिर मोहडे ता-राधानगरी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावत असलेले श्री.दिगंबर टिपूगडे यांना उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती देऊन त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात विविध पदाधिकारी निवडण्याचे अधिकार मिळाले आहेत. श्री. टिपूगडे हे शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्षअसून मा इंद्रजीत देशमुख ( काकाजी ) व मा संपत गायकवाड साहेब यांच्या प्रेरणेतून चालवत असून त्यांना सामाजिक लोकहिताचा प्रचंड अभ्यास आहे. त्यांना यंदाचा कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या या उपाध्यक्ष पदी झालेल्या निवडीने त्यांचे संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.