ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कागल तालुक्यातील यमगे येथे युवकाची आत्महत्या

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील यमगे येथील रोहित बाळासो पाटील (वय ३०) याने आर्थिक अडचणीत असल्याने नैराश्यातून शुक्रवार, दि. २८ जुलै रोजी दुपारी ३.४५ दरम्यान आपल्या माळ नावाच्या शेतात असलेल्या आंब्याच्या झाडाला गळ्यास दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे.
याबाबतची वर्दी दिगंबर बाळासो पाटील यांनी मुरगूड पोलिसांत दिली. घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली असून, अधिक तपास मुरगूड पोलीस करत आहेत