किरीट सोम्मय्या यांचा करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध : श्री. मधुकर जांभळे

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने किरीट सोम्मय्या यांचा जाहीर निषेध करताना जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मधुकर जांभळे म्हणाले की,आमचे नेते व आमचे दैवत नामदार.हसनसो मुश्रीफ साहेब यांचेवर केलेले किरीट सोम्मय्या यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत.किरीट सोम्मय्या याना बोलायला लावणारे धनी वेगळेच आहेत.मागे इनकमटैक्सची रेड मुश्रीफ साहेबांच्यावर टाकली त्यामध्ये काही सापडले नाही.गेली 25 वर्षे साहेब आमदार व मंत्री आहेत,गोरगरिबांचा श्रावणबाळ म्हणून ओळखले जातात.अनेक गोरगरिबांचे ऑपरेशन करुन अनेकांचे संसार उभे केलेले आहेत.
कितिही खोटे आरोप केले तरी जनतेला विश्वास आहे की,यातुन काहीही निष्पन्न होणार नाही.कारण गोरगरिबांचे आशिर्वाद व गोरगरिबांचे अश्रु पुसण्याचे काम साहेबांनी केले आहे.अशा प्रकारच्या आरोपांनी भाजपचा उद्धेश कधिही सफल होणार नाही.जनमानसात भाजपबद्दल चिड निर्माण होऊन मुश्रीफ साहेबांचे हात अधिक मजबूत होतील.
यावेळी कोल्हापुर जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मा.मधुकर जांभळे,करवीर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मा.शिवाजी देसाई,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग करवीर तालुका अध्यक्ष मा.आकाश भास्कर,राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर करवीर तालुका अध्यक्ष मा.युवराज पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेस असंघटित कामगारचे जिल्हाध्यक्ष मा.अमोल कुंभार,राष्ट्रवादी काँग्रेसचे करवीर तालुका उपाध्यक्ष मा.पंडीत कळके,राष्ट्रवादी काँग्रेसचे करवीर तालुका क्रीडा सेल कार्याध्यक्ष मा.सागर डकरे,ग्रामपंचायत बालिंगेचे सरपंच मा.मयुर जांभळे,ग्रामपंचायत जठारवाडीचे सरपंच मा.नंदकुमार खाडे उपस्थित होते.