मुरगूड मध्ये संतसेना महाराज पुण्यतीथी भक्तीमय वातावरणात साजरी.

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड व मुरगूड परीसरातील नाभिक बांधवांचे वतिने मुरगूड मध्ये संत शिरोमणी सेनामहाराज यांची पुण्यतीथी मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरी केली. येथील विठ्ठल – रखुमाई मंदीरात सकाळी संतसेना महाराजांच्या प्रतिमेचे पुजन वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांचे हस्ते करणेत आले . यावेळी प्रविण रनवरे , विनोद रनवरे प्रदिप सुर्यवंशी , अमोल रनवरे , सचिन रनवरे , संजय रनवरे , संदीप रनवरे,विलास रनवरे आदी नाभिक समाज बांधव उपस्थित होते.
त्यानंतर प्रदिप सुर्यवंशी यांचे हस्ते सत्यनारायण पुजा संपन्न झाली . पुजेनंतर भजन किर्तनाचा कार्यक्रम पार पडला शेवटी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते . नाभिक समाजासह वारकरी संप्रदाय व परिसरातील नागरीकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक सुनील रणवरे ,संतोष रणवरे, यश रणवरे , मोहन रणवरे , रामचंद्र रनवरे ‘ जोतीराम पवार , साईराज रणवरे, रोशन रणवरे , सुरज माने , चंद्रकांत माने आदींनी योगदान दिले.