ताज्या बातम्या
ताराबाई रोड येथील गणेश तरुण मंडळ यांच्यातर्फे फिरंगाई आरोग्य केंद्रास उपयुक्त साहित्य केले प्रदान

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालुन नागरिकांची तपासणी करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी, पोलीस, यांना ताराबाई रोड येथील गणेश तरुण मंडळ यांच्या तर्फे फिरंगाई प्राथमिक आरोग्य केंद्राला 200 मास्क आणि 200 हँण्डग्लोज सुपूर्द करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष ओंकार गोसावी, अर्जुन घोरपडे, पुरुषोत्तम ठाणेकर, शुभंकर गोसावी, पार्थ शेट्ये यांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. भिसे यांच्याकडे साहित्य प्रदान केले.