निढोरीत घरकुल लाभार्थ्यांना गृहप्रवेशासाठी चाव्या प्रदान

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
निढोरी (ता. कागल) येथे ग्रा.पं.ने ई-घरकुल लाभार्थ्यांना गृहप्रवेशासाठी बिद्रीचे माजी उपाध्यक्ष केशवराव पाटील, सरपंच अमित पाटील, सदस्य रंगराव रंडे यांच्या हस्ते चाव्या प्रदान करण्यात आल्या. महाआवास ई-घरकुल अभियान अंतर्गत पं. स. कागलमार्फत दि. ३० जूनपर्यंत तालुक्यातील सर्वच ग्रा.पं. नी पूर्ण झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना गृहप्रवेश चावी देण्याचा कार्यक्रम घेतला. निढोरी ग्रा.पं. ने ई घरकुल चावी प्रदान कार्यक्रम घेऊन लाभार्थी वर्गामध्ये चैतन्य निर्माण केले. २०२०-२१ मध्ये १५ घरकुलांपैकी ७ घरकुले पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना चाव्या प्रदान व सत्कारप्रसंगी सरपंच अमित पाटील, बिद्री माजी उपाध्यक्ष केशवराव पाटील, सदस्य रंगराव रंडे, बाजीराव चौगले, ग्रामसेवक आर. के. पाटील, ग्रा.पं. कर्मचारी संजय कांबळे, युवराज भाकरे, अंगणवाडी सेविका घरकुल लाभार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक संपत मगदूम यांनी केले.