सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे संस्थेची चौफेर प्रगती : प्रवीणसिंह पाटील ; विठल रुखमाई ग्राहक संस्थेची 35 वी सवर्साधारण सभा खेळीमेळीत

मुरगूड प्रतिनिधी :
मुरगूड पंचक्रोशितील सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे व संचालक मंडळाच्या पारदर्शक कारभारामुळे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे संस्थेची चौफेर प्रगती सुरु असलेचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन श्री प्रवीणसिंह पाटील यांनी केले.
यावर्षी कोरोना काळात संस्थेने सभासद व ग्राहकांचे साठी व्यवहार सुरू ठेवून सामाजिक बांधिलकी जपली ,शासनाचे मोफत धान्य वाटप त्या काळात करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. ना नफा ना तोटा या संकल्पनेवर रेशन विभाग काम करत आहे .संस्था प्रगती पथावर असून चालू वर्षी चा डिव्हिडंड पुढील वर्षी देण्यात येणार असून यामध्ये दीपावली सणानिमित्त दहा टक्के रिबेट सभासदांना दिलेला आहे. संस्थेला चालू वर्षी इतर सर्व तरतुदी करून 273183/-, नफा झाला असल्याची माहिती चेअरमनसो श्री प्रवीणसिंह पाटील यांनी केले.
मुरगूड ता.कागल येथील विठ्ठल रखमाई सोसायटी हॉल मुरगुड येथील सभागृहात पार पडलेल्या 35 व्या सर्वसाधारण सभेत ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.सभेच्या सुरवातीस सहकार महर्षी विश्वानाथराव पाटील व श्री विठ्ठल रुक्माई यांच्या फोटोप्रतिमेचे
पूजन नामदेव लोकरे व जेष्ठ सभासद बाळासाहेब अंगज यांच्या हस्ते झाले.यावेळी मारुती मेंडके,संजय मोरबाळे,जगनाथ पुजारी, रणजित सासणे, अनंत घाटगे , राजू चव्हाण यांनी विविध प्रश्न उपस्थित केले.कोरोना च्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन सभेचे कामकाज पार पडले.
स्वागत प्रास्ताविकातून प्रविणसिंह पाटील यांनी ग्राहक संस्थे ने राबवलेल्या विविध उपक्रमाचा आढावा घेताना संस्थेच्या समोर विविध समस्या निर्माण होत आहेत यामध्ये प्रत्येक मालावर जीएसटी कर भरावा लागत असले मुळे सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करताना अडचणी येत आहेत .भांडवल वाढवणेसाठी तसेच यापुढे संस्थेचे व्यवहार वाढीसाठी सभासदांनी संस्थेतून खरेदी करावी अशी सूचना काही सभासदानी केली . संस्था प्रगती पथावर आणण्यासाठी हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.कर्मचारी आणि सभासद यांच्या पाठबळावर संस्थेस स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग अ मिळत आहे. अशावेळी सभासदांनी कर्मचाऱ्यांना पाठबळ द्यावे. पुढे ही आपण सभासदांभिमुख कारभार करणार असल्याचे सांगून सभासदांनी संस्थे तुनच मोठ्या प्रमाणात खरेदी करावी असे आवाहन त्यांनी केले.
अहवाल व नोटीस वाचन सचिव सुधीर मोहिते यांनी केले.सभेस उपाध्यक्ष वसंतराव शिंदे आनंदराव कल्याणकर सुखदेव कांबळे इत्यादी तसेच ,श्री सुधीर सावर्डेकर, विजय शेट्टी, अशोक पाटील,प्रल्हाद कांबळे, , बाजीराव दबडे, बाळकृष्ण लोकरे, राजू चव्हाण आदी प्रमुख उपस्थित होतेे .आभार उपाध्यक्ष वसंतराव शिंदे यांनी मानले.