ताज्या बातम्यामहाराष्ट्र
अर्जुनवाडा गावच्या उपसरपंचपदी आनंदी पाटील यांची निवड

प्रतिनिधी – विजय मोरबाळे
अर्जुनवाडा गावच्या उपसरपंचपदी भैरवनाथ ग्राम विकास आघाडीच्या मंडलिक गटाच्या श्रीमती.आनंदी महादेव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राणी कांबळे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुरेखा लुगडे होत्या. सचिव म्हणून ग्रामसेवक पी.बी.कांबळे यांनी काम पाहिले.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी आर.के.लाडगावकर ,के.जी.सातवेकर विशाल कुंभार, प्रदीप पाटील ,संदीप पाटील ,राहुल सातवेकर व सर्व सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन अजितकुमार पाटील व आभार युवराज सातवेकर यांनी मानले.