ताज्या बातम्या
कोगे,कसबा बीड, बहिरेश्वर गावास प्रांताधिकारी नागवकर यांची भेट ! कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला

सावरवाडी ( प्रतिनिधी ) :
करवीर तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाच्या वाढत्या संसर्गा विषयी कडक उपाययोजना कार्यान्वीत करण्याच्या उद्देशाने करवीर चे प्रातांधिकारी वैभव नागवकर यांनी कसबा बीड, कोगे, बहिरेश्वर, या गावांना भेटी देऊन आढावा घेण्यात आला
कसबा बीड येथील सरकारी पाणंदीच्या दुरुस्तीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले . तर बहिरेश्वर गावच्या प्राचीन श्रीकृष्ण तलावाची पाहणी करण्यात आली. गावातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला .
यावेळी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य राजेंद्र सुर्यवंशी ,तलाठी एन एम पाटील , सर्कल प्रविण माने , ग्रामसेवक संदीप पाटील, पोलीस पाटील पंढरीनाथ ताहशिलदार,दिनकर गावडे, प्रकाश तिबीले, दिनकर सुर्यवंशी,सरदार जाधव,आदि उपस्थितीत होते