ताज्या बातम्या
प्रकाश मगदूम यांची रयत शेतकरी संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कोल्हापूर :
रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी माऊली स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक प्रकाश रामा मगदूम यांची निवड करण्यात आली. सदर निवड रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवीप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या संमतीने रयत शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा राणीताई भाऊसाहेब चव्हाण यांनी केली. या निवडीबद्दल प्रकाश मगदूम यांचे राजकीय, सामाजिक अशा सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.