प्रहारी क्लब मुळे व्यसनमुक्त समाज चळवळीला बळ मिळेल : केंद्रप्रमुख डी. के. सावंत
कडगाव :
वाढत्या व्यसनाधीनतेला आवर घालण्याचे काम प्रहारी क्लब मुळे होईल, अशी अपेक्षा कडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख डी .के .सावंत यांनी व्यक्त केले.
कडगाव हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय कडगाव येथे प्रहरी क्लबच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांचे मध्ये मादक पदार्थांच्या विरोधात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसेच अवैध तस्करी प्रतिबंध करण्यासाठी, समाज प्रबोधन आणि विद्यार्थी जाणीव जागृती करण्यासाठी प्रहारी क्लब ची स्थापना करण्यात आली आहे.
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांनी सादर केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार शाळांमध्ये प्रहारी संघाची स्थापना करण्यात येत आहे. प्रहारी क्लब मुळे व्यसनमुक्त समाज चळवळीला बळ मिळेल अशी अपेक्षा आहे. मुख्याध्यापक डॉ.आर .डी. पोवार प्रहारी क्लबचे समन्वय विजयकुमार पाटील, प्रहारी क्लबचे पाचवी ते बारावीचे सर्व स्वयंसेवक ज्येष्ठ शिक्षक ए .डी. देसाई, राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक सी .एस. मासाळ उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक ए. एम .भडगावकर यांनी केले. सी. एस .लिमकर यांनी आभार मानले.