ताज्या बातम्यामहाराष्ट्र
Income Tax विभागाला आधार कार्डचा क्रमांक न दिल्यास भरावा लागणार दंड…..!

टीम ऑनलाईन :
आर्थिक विधेयक 2021 च्या 127 संशोधनासह संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित करण्यात आले आहे. बुधवारी या विधेयकावर राज्यसभेत चर्चा झाली. लोकसभेत हे विधेयक मंगळवारीच पारित झाले होते.
संशोधित आर्थिक विधेयकाच्या नुसार, आयकर विभागाकडून एखाद्या व्यक्तीकडून आयकर कायद्यानुसार आधार क्रमांक मागत असेल आणि करदात्याने निर्धारित कालावधीपर्यंत तो न दिल्यास त्याला 1 हजार रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे.
सध्या इनकम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरण्यासाठी विलंब लागल्यास त्यावेळी सुद्धा दंड स्विकारला जातो. आता आधार कार्डचा क्रमांक न दिल्यास सुद्धा दंड भरण्याचे त्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.