गडहिंग्लज मधील पार्श्व उद्योग समूह यांच्या वतीने भगवान श्री महावीर जयंती निमित्य अनोख्या उपक्रमाने साजरी

गडहिंग्लज प्रतिनिधी:(सोहेल मकानदार)
गडहिंग्लज शहरातील ‘पार्श्व उद्योग समुह’नेहमीच सामाजिक बांधिलकी मधून कार्यरत असते. आज भगवान श्री महावीर स्वामी यांचे जन्मकल्याणक ( जयंती ) निमित्त कोविड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावाचे संकट पाहता आपल्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी कार्यरत असणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, आरोग्य सेवक , अत्यावश्यक सेवा क्षेत्रात नगरपालिकेच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या सेवकांच्यासाठी पीपीई किट,मास्क, सँनिटायझर यांचे मोफत वितरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्याकडे वस्तू स्वरूपात सुपूर्त करण्यात आले.आपण समाजाचे काही तरी देणे लागतो व त्याही पेक्षा भगवान महावीरांची शिकवण “जगा आणि जगू द्या या हेतूने” हा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम पार्श्व उद्योग समुहाने हाती घेतला. या उपक्रमा वेळी पार्श्व उद्योग समूहाचे प्रमुख श्री प्रकाश शहा , दिनेश शहा , योगेश शहा,महेश शहा उपस्थित होते तसेच नगरपालिकेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.