पी. के. पाटील यांचे शैक्षणिक कार्य गौरवास्पद आहे; माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे प्रतिपादन.

सावरवाडी प्रतिनिधी :
शैक्षणिक क्षेत्रात ध्येयवादी वृत्तीने पी.के. पाटील यांनी केलेले कार्य हे गौरवास्पद असुन आदर्श विद्यार्थी घडविणे म्हणजे देश सेवा असल्याचे प्रतिपादन कुंभी कासारी साखर कारखाण्याचे चेअरमन व माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.
कारखाना स्थळावरील श्रीराम हायस्कूलमधील शिक्षक पी.के. पाटील यांच्या आयोजित सेवानिवृत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून नरके बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार प्रा जयंत आसगावकर होते.
सेवानिवृत्त समारंभाला उत्तर देतांना पीके पाटील म्हणाले शिक्षणातून माणूस मोठा होतो . सहकार नेते कै दत्तात्रय पाटील यांच्या आदर्श विचाराचा वारसा जपत शिक्षण क्षेत्रात कार्य सुरू केले .
अध्यक्षीय भाषणात बोलतांना शिक्षक आमदार प्रा जयंत आसगावकर म्हणाले देशाची आदर्शपिढी घडविण्याचे कार्य करणारी शिक्षकांचे सारे आयुष्य हे समाजाभिमुख असते. शिक्षणातून मिळालेले ज्ञानरूपी संजीवनी जीवनात श्रेष्ठ ठरते .पी के पाटील यांचे शिक्षण व्रत हे प्रेरणादायी आहे.
यावेळी प्राचार्य ए के भगाटे, राजू मुल्लणी , सुरेश पाटील , आदिनी मनोगत व्यक्त केली . विविध मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षक पीके पाटील यांचा सत्कार करण्यात आला . प्रारंभी अजित कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले सुत्रसंचलन सागर शिंदे यांनी केले . शेवटी उपप्राचार्य सीएन वाळके यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.