ताज्या बातम्या
पी. डी. मगदूम यांच्याकडून ग्रामीण रुग्णालयास केल्विनेटर ए. सी. ची मदत

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड येथील कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष, राजर्षी शाहू पतसंस्था व ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष, माजी प्राचार्य पी डी मगदूम यांनी मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयास ऑपरेशन थिएटर मध्ये अत्यावश्यक बाब म्हणून तीस हजार किमंतीचा केल्विनेटर एसी भेट दिला आहे .
ग्रामीण रुग्णालयास केल्विनेटर एसी डॉ. अमोल पाटील यांच्याकडे सुपुर्त करण्यात आला. यावेळी माजी प्राचार्य पी. डी. मगदूम, दीपक आंगज, एम के चौगले, जे एस शिंदे, सर्जेराव कदम, तबस्सुम सय्यद, बी डी पाटील उपस्थित होते .