ताज्या बातम्या
शिंदेवाडी येथील रामचंद्र गिरी यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून २०२०-२१ सालातील दिला जाणारा उत्कृष्ट कर्मचाऱ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मिणचे खुर्द येथील औषध निर्माण अधिकारी रामचंद्र श्रीपती गिरी (शिंदेवाडी मुरगूड) यांची निवड झालेली आहे. शाहू जयंती दिवशी हा पुरस्कार वितरण सोहव्य होणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर अत्यावश्यक औषधांसह व कोविड १९ या साथीच्या आजारावरील प्रतिबंधात्मक उपाय व उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनसामग्री व औषध साठा जिल्हा परिषदेच्या औषध भांडारातून योग्य प्रमाणात उपलब्ध करून त्याचे वितरण आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांना करण्याचे उत्कृष्ट कार्य गिरी करत आहेत.