फिरंगाई परिसर,शिवाजी पेठ परिसरातील नागरिकांसाठी दि.27 रोजी मोफत कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन : नगरसेविका सौ. तेजस्विनी इंगवले

कोल्हापूर प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
शिवसेना माजी शहरप्रमुख रविकिरण इंगवले व विद्यमान नगरसेविका सौ तेजस्विनी इंगवले यांच्या सहकार्याने शिवाजी पेठ आणि फिरंगाई प्रभागातील नागरिकांच्या साठी महानगरपालिकेच्या वतीने सोमवार दि. 27 रोजी मोफत लसीकरणाचे शिबीर आयोजन केले आहे.
यावेळी नगरसेविका तेजस्विनी इंगवले यांनी सांगितले की शिवाजी पेठ परिसरातील नागरिकांसाठी आणि प्रभागातील नागरिकांसाठी फिरंगाई मंदिर, आणि कोल्हापूर हायस्कूल जवळील भारत मंदिर अशा दोन्ही ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 4 पर्यंत लसीकरण शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच प्रभागातील आणि शिवाजी पेठ परिसरातील नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा.
ज्यांनी कुणी अजून पहिला डोस घेतलेला नाही त्यांनी पहिला डोस द्यावा.आणी पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेल्यांनी दुसरा डोस घ्यावा असे आव्हान नगरसेविका सौ तेजस्विनी इंगवले आणि शिवसेना माजी शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केले आहे.