सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात पदवीनंतरच्या करिअरच्या संधी’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता कागल येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत बी. एस्सी. व बीसीए विभागाच्यावतीने ‘पदवीनंतरच्या करिअरच्या संधी’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार होते. या कार्यशाळेत कर्मवीर हिरे महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. सागर व्हनाळकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी पदवीनंतर विद्यार्थ्यांना असणाऱ्या करिअरच्या संधी, विषयनिहाय रोजगार, उच्च शिक्षण व विविध शाखा यांची सविस्तर माहिती दिली. याबरोबरच करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांत आवश्यक असलेले गुण व कौशल्ये याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनीही मार्गदर्शन केले. या ऑनलाईन कार्यशाळेस अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्वयक डॉ. शिवाजीराव होडगे, उपप्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांच्यासह विद्यार्थी, व शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळेचे स्वागत एस. बी. खराडे यांनी केले. प्रास्ताविक बी. एस्सी. विभागप्रमुख एस. एस. मांगले यांनी केले. सूत्रसंचालन दिपाली भोळे यांनी केले. आभार ए. सी. कुंभार यांनी मानले.