ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आषाढी वारीसाठी वारकऱ्यांसाठी धावणार भारतीय रेल्वेच्या विशेष गाड्या

मध्य रेल्वेच्या वतीने आषाढीसाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून व इतर राज्यांतून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकरी व भाविकांसाठी एकूण 82 विशेष गाड्या धावणार आहेत. नियमित धावणाऱ्या गाड्यांसह एकूण 181 गाड्या या कालावधीत धावतील. यामध्ये नागपूर- मिरज विशेष रेल्वे गाडीच्या 25 आणि 28 जूनला चार फेऱ्या होतील.

नागपूर- पंढरपूर विशेष रेल्वे गाडी आणि अमरावती- पंढरपूर विशेष रेल्वे गाडीच्या 26 आणि 29 जूनला चार फेऱ्या होतील, खामगाव- पंढरपूर विशेष रेल्वे गाडी आणि भुसावळ- पंढरपूर विशेष रेल्वे गाडीच्या 26 आणि 29 जूनला चार फेऱ्या होतील. लातूर- पंढरपूर- लातूर विशेष रेल्वे गाडीच्या 26 ते 30 जूनपर्यंत आठ फेऱ्या होतील, मिरज- पंढरपूर- मिरज विशेष रेल्वे गाडीच्या 24 जून ते 3 जुलै दरम्यान आणि मिरज – कुर्डुवाडी – मिरज विशेष रेल्वे गाडीच्या 20 फेऱ्या होतील. पंढरपूर -मिरज -पंढरपूर या विशेष रेल्वे गाडीच्या 24 जून ते 3 जुलै दरम्यान दहा फेऱ्या होणार आहेत.

जालना – पंढरपूर, पंढरपूर – नांदेड, औरंगाबाद – पंढरपूर, पंढरपूर – औरंगाबाद या विशेष रेल्वेच्या 28 व 29 जून अशा दोन फेऱ्या होणार आहेत. आदिलाबाद- पंढरपूर- आदिलाबाद विशेष रेल्वे गाडीच्या 28 जून आणि 29 जून अशा दोन फेऱ्या होतील.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks