करवीर तालुक्यात निशिगंध फुल शेतीच शेतकऱ्यांचा वाढता कल !

सावरवाडी प्रतिनिधी :
वाढत्या महागाईच्या काळात ऊसशेतीला पर्याय पीक म्हणून निशिगंध फुलशेती फायदेशीर बनली आहे . दररोज च्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागात फुलशेतीकडे शेतकऱ्यांचा काल वाढू लागला आहे
सध्या ऊसशेतीसाठी येणारा खर्च आणि ऊसातून मिळणारा नफा याचे गणित विस्कले आहे . उत्पादन खर्चाच्या आधारे ऊसाला दर मिळत नाही खते , पाणीपट्टीचे वाढलेले , मशागतीचा वाढता खर्च यामुळे ऊसशेती शेतकऱ्यांना सध्या परवडत नाही . ऊसाला पर्याय म्हणून करवीर तालुक्यात शेतकरी निशिगंध फुलशेतीकडे वळू लागला आहे . बाजारपेठेत सणासुदीच्या काळात निशिगंध फुलांना मागणी जास्त असते . बाजारपेठेत निशिगंध फुलांना चांगला दर मिळत असल्यामुळे निशिगंध फुलशेतीतून एकरी ७० ते ८० हजार रुपयांचा आर्थिक फायदा होऊ लागला आहे . करवीर तालुक्यात दोनशे एकर शेती मध्ये निशिगंध फुलशेतीची लागवड करण्यात आली आहे . मुंबई गोवा, पूणे, निपाणी, बेळगाव रत्नागिरी आदि बाजारपेठेत निशिगंध फुलांची वाहतुक होत असते