राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने मुरगूड मध्ये फटाके मुक्त दिवाळी अभियान

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
फटाकेमुक्त दिवाळी अभियान नुसते प्रबोधनाचा कार्यक्रम न होता . यातून परिवर्तन अपेक्षीत आहे . विद्यार्थ्यांनी आपण राष्ट्रीय हरित सेनेचे हरित सैनिक पर्यावरण रक्षणार्य लढणारे योद्धे आहोत याची जाणीव ठेवावी . आणि स्वतः पासून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्यास सुरवात करावी असे प्रतिपादन वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी केले .ते येथील शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगूडच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने आयोजित फटाके मुक्त दिवाळी अभियान कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करतांना बोलत होते . कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी उपख्याध्यापक रविंद्र शिंदे ते होते .
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री शिंदे म्हणाले, फटाक्याच्या पासून निर्माण होणाऱ्या धुरामुळे, आवाजामुळे, आणि प्रकाशामुळे पर्यावरणास खूप मोठी हानी पोहोचत असून, विद्यार्थ्यांनी फटाके न फोडता त्या पैशातून पुस्तके व शालोपयोगी वस्तू खरेदी कराव्यात त्यातून सुद्धा त्यांना आनंद मिळेल .
स्वागत पी.डी. रणदिवे यांनी , प्रास्ताविक वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी तर आभार ए.पी. देवडकर यांनी मानले .या कार्यक्रमास सौ.एस.जे. कांबळे, सौ.एस. डी. देसाई ,सौ जी. एस. डवरी, एन. एच .चौधरी , आर.आर. चव्हाण, एस .एस मुसळे आदींसह हरित सेनेचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.