ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आजरा : एसटी बस अडवून महामंडळाचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

आजरा तालुक्यातील कोरिवडे येथे एसटी बस अडवून महामंडळाचे एस.टी.फेऱ्यांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी तसेच शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी बबन परसु चौगुले यांचेवर आजरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.सदर प्रकार शुक्रवारी सकाळी सव्वा सात वाजता घडला. याबाबत चालक संजय यशवंत लोहार यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिली आहे.