कागल येथे सामाजिक सुरक्षा सुविधा केंद्रात योजनादुत कार्यशाळा उत्साहात संपन्न

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल येथे २०२१ पासून डॉ.आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था , YUVA व Unicef यांच्यामार्फत सामाजिक सुरक्षा सुविधा केंद्र कार्यरत आहे. या अंतर्गत विविध शासकीय योजनांची माहिती वंचित घटकांपर्यंत पोहचविने व त्यांना लाभ मिळवून देण्याचे काम संस्था करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कागल तालुक्यातील विविध गावातून एकूण २५ लोकांची योजनादुत म्हणून निवड करण्यात आली आहे व त्यांना आज सर्व शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
यामधे योजना कोणती ? पात्रता काय ? कागदपत्रे कोणती जोडावी ? कोणत्या विभागाला भेट द्यावी ? लाभ काय ? या प्रश्नांवर चर्चासत्र घेण्यात आले .
यामध्ये योजनादुत म्हणून ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, बालपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, प्रेरक- प्रेरीका,CRP, पंचायत समिती कागलचे विविध विभागातील पदाधिकारी व डॉ.आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचे संस्थापक ललित बाबर, संस्थेच्या संचालिका प्रभा यादव ,संस्थेचे कार्यकर्ते अमोल कदम, निता आवळे व रविना माने उपस्थित होते.
या कार्यशाळेत आलेल्या सर्वांनीच कामाप्रती सकारात्मक प्रतिसाद दिला व आपले विचार व्यक्त केले. भडगांव चे सरपंच दिलीप चौगुले यांनीही आलेल्या योजनादुताना मार्गदर्शन केले.