गुजरातमधील औषध कंपनीत बनवलेल्या कफ सिरपच्या उत्पादनावर बंदी

गुजरातमधील एका औषध कंपनीत बनवलेल्या कफ सिरपच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. या कफ सिरपमध्ये शरीराला हानी पोहोचवणारी घातक केमिकल आढळून आल्याचा आरोप आहे. गुजरातच्या अन्न आणि औषध नियंत्रण विभागाने कफ सिरपचे उत्पादन बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.
विभागातील प्रशासकीय आयुक्त एचजी कोसिया यांनी सांगितले की, गुजरातस्थित फार्मास्युटिकल कंपनी नॉरिस मेडिसिन्स लिमिटेडची तपासणी करण्यात आली. यामध्ये कंपनीत तयार होणाऱ्या कफ सिरपची चाचणी घेण्यात आली. कफ सिरपमध्ये घातक रसायने असल्याचे चाचण्यांमधून समोर आले आहे.
अशा स्थितीत कंपनीला औषधाचे उत्पादन थांबवून बाजारात असलेले सिरप मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणी दरम्यान, कंपनीने औषधांच्या निर्मितीबाबत सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे योग्य पालन केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.