मंडलिक साखर कारखान्याची अध्यक्ष उपाध्यक्ष निवड आज पार पडणार

लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आज (ता. २३) रोजी सकाळी अकरा वाजता कारखाना कार्यस्थळावर विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा होईल. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संभाजी पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
चेअरमन पदासाठी खास. संजय मंडलिक यांचे नाव निश्चित मानले जात असून उपाध्यक्षपद कोणाला मिळणार याचे औत्स्युक्य उरले आहे. तालुक्यातील सर्वच मान्यवर नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध, सभासदांचा मंडलिक कुटूंबावर असलेला विश्वास व कार्यकर्त्यांनी दिलेली साथ या बळावर खासदार जबाबदारी संजय मंडलिक यांनी मुत्सद्दी व पार पाड कुशल नेतृत्वाने २०१७ ते २०२२ व २०२३ ते २०२८ अशी सलग दुसऱ्यांदा कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली. जिल्हा परिषद, पंचायत समिती, खासदारकी, आमदारकी डोळ्यासमोर ठेवूनच नवीन संचालक मंडळात जुन्या बरोबरच नवीन चेहऱ्यांना संचालक पदाची संधी देत समतोल साधण्यात आला आहे.