मुरगूड आणि परिसरात गणेशोत्सव होणार साधेपणाने

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा गणेशोत्सव मुरगूड पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील ५४ गावांत अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्धार गणेश तरुण मंडळे, पोलीस पाटील व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आला. मुरगूड पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सवासंदर्भात ५४ गावांतील गणेश तरुण मंडळे व गावचे पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक येथील श्रीराम मंगल कार्यालयात पार पडली. बैठकीत पोलीस प्रशासनातर्फे सूचना व नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे यांनी यासंदर्भात प्रास्ताविकातून भूमिका मांडली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे प्रमुख उपस्थितीत होते .
यावेळी महादेव साठे, कॉ. अशोक चौगले, ओंकार पोतदार, आकाश पाटोळे यानो आपली मते मांडली. या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक पीएसआय किशोरकुमार खाडे यांनी केले तर आभार पीएसआय कुमार ढेरे यांनी मानले.यावेळी पोलिस नाईक स्वप्नील मोरे, सुदर्शन पाटील ,राम पाडळकर,यांचेसह पोलीस पाटील आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले.