ताज्या बातम्यामहाराष्ट्र

खुशखबर : भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास !

जागतिक भालाफेक स्पर्धेत भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने दणदणीत कामगिरी केली आहे. नीरजने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. त्याने 88.17 मीटरपर्यंत भालाफेक केली. तर, पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्याला रौप्यपदक जिंकण्यात समाधान मानावे लागले.

हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या (अॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप) World Athletics Championship 2023 च्या शेवटच्या दिवशी आज भारताला भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले आहे. नीरजने 88.17 मीटर लांब भालाफेक करून ही सुवर्ण कामगिरी केली. 2020 साली ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्राने आज येथे जागतिक स्पर्धेत पुन्हा सुवर्ण कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचा झेंडा आणखी उंच केला. यापूर्वी नीरज चोप्राने World Athletics Championship स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks