ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मनसेचे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांचा सात ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौरा

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे हे सात ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. एक दिवसांचा त्यांचा दौरा असणार आहे. या दरम्यान ते पक्षाच्या बैठका, कामगार सेनेचे न्याय व हक्कासाठी बांधणी करणार आहेत. सकाळी नऊ वाजता त्रिवेणी हॉटेल आदमापूर तून हमिदवाडा – कागल या महामार्गावरून दौऱ्याला सुरवात होणार असून शेवट कोल्हापूरला होणार आहे.
त्यामुळे कोल्हापुरातील कामगार व मनसेचे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिकांनी उपस्थित राहण्याच्या आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे कोल्हापूर चिटणीस रोहन निर्मळ यांनी दिली आहे यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे गट अध्यक्ष युवराज येडूरे, पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.