राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षक निर्णायक- प्रा. डॉ.उदय शिंदे

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणी मध्ये शिक्षकांची भूमिका निर्णायक असून शिक्षकांच्या प्रभावी आणि सक्रिय सहभागाशिवाय या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी होऊ शकत नाही असे मत प्रा .उदय शिंदे यांनी येथे बोलताना व्यक्त केले. सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातील सॉक्रेटिस क्लब, समाजशास्त्र विभाग व आयक्यूएसी च्या वतीने आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह अंतर्गत व्याख्यान देत असताना ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार हे होते. प्रा. शिंदे पुढे म्हणाले की या धोरणांतर्गत शिक्षकाची भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्यानुसार शिक्षकांनी स्वतःला अद्यावत करणे व धोरणातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्या आपल्या भूमिकेत आवश्यक तो बदल करणे गरजेचा आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा एक परिवर्तनाचा आराखडा असून सर्वव्यापी आहे. आणि यात विद्यार्थ्यांचा सर्वव्यापी सर्व समावेशक विकासाचा अंतर्भाव केला आहे हे त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ अर्जुन कुंभार यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उत्साहाने स्वीकारून त्याची अंमलबजावणी करणे कल्याणकारी असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी प्रारंभी स्वागत प्राध्यापक पांडुरंग सारंग यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. सौ माणिक पाटील यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. टी एम पाटील ग्रंथपाल प्रा. टी एच सातपुते, प्रा. डॉ. के एस पवार, मराठी विभाग प्रमुख प्रा.शिवाजीराव. होडगे तसेच जिमखाना प्रमुख प्रा. शिवाजीराव पोवार, इंग्रजी विभागाचे प्रा. विनोदकुमार प्रधान,प्रा. दीपक साळुंखे प्रा.डी ए सरदेसाई, प्रा. एच एम. सोहनी सह सर्व प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.