कोरोना नंतर शाळा सुरू ही नव्या पर्वाची नांदी : दिपाली पाटील

तरसंबळे प्रतिनिधी : शाम चौगले
गेल्या दीड वर्षानंतर शाळा सुरू होत आहे ही एका नव्या पर्वाची नांदी असून कोरोनाला हरवून आपण सकारात्मक पावले उचलली आहेत . योग्य ती काळजी घेऊन शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य करावे असे अवाहन सौ.मा. सभापती दिपाली पाटील यांनी तरसंबळे(ता.राधानगरी) येथे शाळा शुभारंभ व स्वागत समारंभ प्रसंगी केले . दिपाली पाटील यांच्या हस्ते मुलांना सॅनिटायझर, मास्क व गुलाबपुष्प देऊन मुलांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी शाळांमध्ये सुरू असलेले हँडवॉश स्टेशन,स्वागत कमान हॉल नूतनीकरण या विकास कामांची प्रत्यक्ष पहाणी करून सदस्या दिपाली पाटील यांनी तात्काळ ५० हजार रुपयांचा निधी जाहीर केला.
यावेळी मा .दिपक पाटील, सरपंच गणपती कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती सागर पाटील, डे .सरपंच नारायण रेडेकर , पोलीस पाटील गुरुनाथ कांबळे , ग्रामसेवक लक्ष्मण इंगळे, मारूती आंबेकर, प्रभाकर पाटील, धनाजी गुरव, सुनिल चौगले , प्रकाश धामणे यांचेसह मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, अध्यापक गोविंद पाटील , वसंत सावंत , सुरेश डवरी ,एम.टी. पाटील इ. शिक्षक स्टाफ उपस्थित होता.