ताज्या बातम्यामहाराष्ट्र
Unicef च्या बालस्नेही ग्रामपंचायत उपक्रमात व्हन्नुर दुसऱ्या क्रमांकावर

कागल तालुक्यातील व्हन्नुर येथील ग्रामपंचायत कार्यालयाला unicef ने दि.१६ ऑक्टोबर रोजीने भेट दिली. बाल पंचायत आणि त्यांनी केलेल्या कामाचे प्रमुख पाहुणे देविका देशमुख यांनी कौतुक केले,तसेच गावातील सर्व विभागांची माहिती घेतली आणि येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या व देविका देशमुख यांनी व्हन्नुर ला केंद्रस्थानी ठेवून गावच्या विकासासाठी प्रयत्न करू असे सांगितले.
यावेळी Unicef चे राज्यसल्लागार प्रमोद कालेकर,unicef consultant कामिनी कपाडिया, युवा संस्थेकडून सुरेश लुले आणि डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचे संस्थापक ललित बाबर,संस्थेच्या संचालिका Adv. प्रभा यादव,अमोल कदम,नीता आवळे,रविना माने,सरपंच पूजा मोरे, ग्रामसेवक ,बालसरपंच साक्षी जाधव आणि गावातील ग्रामपंचायत व बाल पंचायतचे सर्व सदस्य तसेच विविध विभागातील शासकीय कर्मचारी उपस्थित होते.