वक्तृत्व कला विकसित करण्यासाठी स्पर्धेत भाग घ्या ; वक्तृत्वामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो : डॉ . विलास पाटील

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
वक्तृत्व कला विकसित करण्यासाठी स्पर्धेत भाग घ्यायचा असतो . बक्षीसासाठी नाही . ही व्यक्तिमत्व विकासाची स्पर्धा आहे . ती तुम्हाला व्हॅल्यु मिळवून देते .वक्तृत्वामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो . समाजाचे प्रबोधन करण्यासाठी ही कला गरजेची आहे . असे प्रतिपादन सारथी पुणेचे कार्यकारी अधिकारी ( शिक्षण )डॉ .विलास पाटील यांनी केले .
मुरगुड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात दिवंगत लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या जयंती निमित्त सदाशिवराव मंडलिक चषक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ .अर्जुन कुंभार होते . डॉ. पाटील म्हणाले ,विद्वान सर्वत्र पूज्य आहेत . विद्वत्ता एका स्पर्धेने येत नाही .
वाणीची उपासना करा , तुम्ही स्वतःला शोधला तर फार मोठे व्हाल .जास्त बक्षीस मिळवली पण ती व्यक्ती जीवनात ट्रॅकवर नसते . मात्र कमी बक्षीस मिळवणारी व्यक्ती आज चांगल्या नोकरीवर बघायला मिळते . वक्तृत्व असणाऱ्या शक्तींनी क्रांती घडली आहे क्रांतिकारक विचारांने बदल घडले आहेत .शब्दावर स्वार होणारा समाज जिंकू शकतो . तुम्ही तुम्ही व्हा ,कार्बन कॉपी होऊ नका .वाचन हे व्हिटॅमिन आहे .काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये .कलेने आपल्याला दत्तक घेतले पाहिजे . त्यासाठी तेवढे समर्पण पाहिजे .
ज्ञानप्राप्ती साठी देशाटन , पंडिताशी मैत्री ,सभेत संचार आणि वाचन हे चार मार्ग आहेत .शिक्षण शर्यत नसून मॅरेथॉन आहे .शर्यत जिंकण्यासाठी शक्ती पायात नसून मेंदूत असते . ज्ञानाची तृष्णा निर्माण झाली पाहिजे .ज्ञान ही आज पॉवर बनली आहे .गुण म्हणजे गुणवत्ता नव्हे .तुमच्या स्किल काय आहे .वेळेचा उपयोग पैशासारखा करा .जीवनात सर्व शक्य आहे . मात्र पायाखालचा रस्ता चांगला पाहिजे .
यावेळी प्राचार्य अर्जुन कुंभार म्हणाले , प्रत्येकाने आपल्यातील वक्तृत्व गुण विकसित केले पाहिजेत ‘ नेतृत्व करण्यासाठी वक्तृत्व असणे गरजेचे आहे .
स्वागत प्रास्ताविक स्पर्धा समन्वयक डॉ . शिवाजी होडगे यांनी केले .सूत्रसंचालन तृप्ती गवाणकर , सुशांत पाटील यांनी केले. आभार के.एस.पवार यांनी मानले .