ताज्या बातम्या
निधन वार्ता : रुक्मिणी कुंभार

बिद्री : बोरवडे ( ता. कागल ) येथील श्रीमती रुक्मिणी नामदेव कुंभार ( वय ९२ ) यांचे वार्धक्याने निधन झाले. कागल पं. स. चे माजी सदस्य, बोरवडे गावचे माजी सरपंच रघुनाथअण्णा कुंभार, बिद्रीच्या दुधसाखर कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य अरविंद कुंभार आणि प्रगतशील शेतकरी अनिल कुंभार यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. २६ रोजी सकाळी नऊ वाजता बोरवडे येथे आहे.