ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनाथ – वंचितांसाठी मदतीचा हात म्हणजे डॉ. सुनिलकुमार लवटे – डॉ . जी.बी कमळकर

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

डॉ. सुनिलकुमार लवटे यांचे जीवन संघर्षाची एक कहाणी असून त्यातून प्रत्येकाने प्रेरणा घेवून स्वतःचे व्यक्तीमत्व साकारावे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले यांनी केले .

तर या परिसंवादाचे दुसरे पुष्प गुंफतांना गटशिक्षणाधिकारी जी बी कमळकर म्हणाले, डॉ. सुनिलकुमार लवटे सरांचा सहवास हा सर्वांसाठी प्रेरणादायी असून प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणारा असा आहे . एक संवेदनशील मनाचा शिक्षक , याचबरोबर माणसं जोडणारा माणूस अशी त्यांची प्रतिमा असून ,जिथे चांगले तिथे डॉ. लवटे सर हजर असतात .

डॉ. सुनिलकुमार लवटे जीवन व कार्य या विषयावर परिसंवादाचे आयोजन येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात करण्यात आले होते .याचे संयोजन शिवराज विद्यालय ज्युनि. कॉलेज व मुरगूड विद्यालय ज्युनि. कॉलेज यांचे वतिने करणेत आले होते .

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ .टी एम् पाटील हे होते .

यावेळी शिवराजचे प्राचार्य पी डी माने, मुरगुड विद्यालय ज्युनि कॉलेजचे प्राचार्य एस आर पाटील , डॉ. शिवाजीराव होडगे, केंद्रप्रमुख यमगे ए एन पाटील, रमेश कदम, प्रा. अनिल पाटील, समीर कटके आदींसह शिवराज ज्युनि. कॉलेज व मुरगूड विद्यालय ज्युनि. कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक शिवराजचे उपप्राचार्य आर बी शिंदे यांनी , सूत्रसंचालन वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांनी तर आभार डॉ . शिवाजीराव होडगे यांनी मानले .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks