ताज्या बातम्यामहाराष्ट्र
सतेज मॅथ्स परीक्षेत मुदाळच्या प.बा. संकुलाचा प्रतिक पाटील पहीला.

कोल्हापूर :
डॉ.डी.वाय. पाटील आभियांत्रिकी महाविघालय साळोंखेनगर, कोल्हापूर यांचेवतीने जून २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षेत मुदाळ येथील प.बा.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा कु. प्रतिक प्रकाश पाटील याने प्रथम क्रमांकाचे यश संपादन करून जिल्हयात स्कॉलर ठरला. या संकूलातील कु. गिरीश नामदेव पाटील,कु अभिषेक ज्ञानदेव चव्हाण,कु.वैष्णवी पाटील व वेदांत कृष्णात पाटील यांनी या परीक्षेत उल्लेखनिय यश संपादन केले.
सतेज मॅथ्स स्कॉलर बक्षीस वितरण साळोखेनगर येथील डॉ.डी.वाय.पाटील संकूल हॉलमध्ये पार पडला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांचे शुभहस्ते व मान्यवरांच्या उपास्थितीत संपन्न झाला. मुदाळच्या शिक्षण संकुलातील विद्याथ्र्यानी सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षेत एकाच वेळी पाच विद्याथ्र्यानी मिळवलेल्या यशाबद्दल आम.पाटील यांनी विषेश कौतुक करुन आभिनंदन केले.