ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका व्यवसाय जोमात ; हप्त्यासाठी दाखवण्यापुरती कारवाई ; कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या दमदार कामगिरीला कळे पोलिसांकडून गालबोट

कळे -वार्ताहर अनिल सुतार

मटका बुकीला ‘ या ‘ साहेबांचे स्कॉड, ‘त्या ‘साहेबांचा हप्ता, नवीन आलेले साहेब ऐकत नाहीत, थोडं वाढवून द्या, असे सांगत काही पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या हप्तेगिरीने आणि अभयाने कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका धंदा जोरात सुरू आहे .इथला प्रत्येक जुगारी बेवडा स्वतःचे नाव, गाव विसरेल परंतु कल्याण-मुंबईच्या मटका एक्सप्रेसचा आनंद घेण्यास कुठेच कमी पडत नाही .खुलेआम सुरु असणाऱ्या मटका व्यवसायाकडे कळे पोलिसांनी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करुन स्वतःचे कर्तव्य खुंटीला टांगल्याची विदारक स्थिती आहे.पोलिस अधिक्षकांच्या दमदार कामगिरीला कळे पोलिसांकडून गालबोट लावण्याचा प्रकार सुरु आहे .

मटका म्हणजे पाण्यावरची मलई काढण्याचा धंदा. बीन भांडवलात किंवा कमी भांडवलात मटका किंग बनता येते . असा काहींचा गैरसमज . या काळ्या पैशातून भरपूर दानधर्म व देणग्या देऊन ‘धर्मात्मा’ बनता येते. हे सगळं हेरुन व येथील वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने कळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका किंगनी अलीकडील काळात चांगले पाय रोवलेत.

मे २०२३ अखेर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून प्रमोद सुर्वे यांनी काम पाहिले.पण त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्या भल्याभल्यांना धडकी भरवली होती. त्यामुळे अवैध वाले बिळात जावून बसल्याने सामान्य लोकांनी श्री सुर्वेचे तोंडभरुन कौतुक केले. त्यांच्या बदलीनंतर जुलै २०२३ मध्ये रुजू झालेले नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या कारकिर्दीत मात्र अवैध धंदेवाल्यांनी आपलं डोक वर काढलं . पुन्हा मटका व्यवसायांना ऊत आला . कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक-दोन मटका मालक असताना व सर्वांचा मिळून एक हप्ता ठरलेला असताना नुतन स.पो.नि यांनी कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका व्यवसाईकांचे कळे,पुनाळ व बाजारभोगाव अशा तीन विभागात तीन मटका मालक ठेवून ठिकठिकाणी अगणित मटक्यांच्या टपऱ्या सुरू करून प्रत्येक विभागाकडून दर महिना दीड ते दोन लाख रुपये हप्ता घेतला जात असल्याचे परिसरातील जाणकारांतून बोलले जात आहे.

झालेल्या नवरात्रोत्सव काळात पुनाळ येथील महिलेने मटका अड्ड्यावर येऊन पतीस चपलेचा प्रसाद दिला असल्याचे सर्वश्रुत असताना व वेळोवेळी सोशल मीडियावर व वर्तमान पत्रातून कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटका व्यवसायावर ताशेरे ओढले जात असतानाही कळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून दाखवण्यापुरती कारवाई करुन पुन्हा चार दिवसांत मटका अड्डे सुरु ठेवले जात असल्याची जोरदार चर्चा असून ही कोल्हापूर पोलिस प्रशासनातील सर्वात मोठी शोकांतिका मानली जाते. त्यामुळे कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका व्यवसायास पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी सामान्यांतुन व गोरगरीब महिलांकडून होत आहे.

सामान्यांना मटका टपऱ्या दिसतात . मग पोलिसांना का दिसत नाहीत . यामागचे ढपल्या चे गणित दडले असुन मटका पंटर , मालक यांच्याशी संपर्कात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी होणेची गरज आहे . त्यासाठी मोबाईल काॕल रेकाॕर्ड तपासले तर बऱ्याच भानगडी बाहेर पडतील अशी शक्यता आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks