कागल : ऐतिहासिक हिंदूराव घाटगे पटांगणवरील साने गुरुजी व्यासपीठ काढलेबाबत राष्ट्रवादीच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल नगरपरिषद मालकीच्या ऐतिहासिक हिंदुराव घाटगे विद्यामंदिरच्या पटांगणामध्ये साने गुरुजी व्यासपीठ होते. त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी व्याख्यानमाला मोठ्या प्रमाणात होतात. तसेच ऐतिहासिक अशा शाळेच्या ग्राउंडवरील व्यासपीठावर अनेक सांस्कृतिक व प्रबोधनाचे कार्यक्रम होत होते. सध्या त्या ठिकाणी विरंगुळा केंद्राचे काम सुरू असल्याचे दिसते तरी कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मार्फत कागलचे मुख्याधिकारी मा . प्रवीण म्हेत्रे यांना निवेदन देवून विनंती करण्यात आली की, ऐतिहासिक शाळेच्या ग्राउंड वरील साने गुरुजी व्यासपीठाचे अस्तित्व अबाधित राहावे अशी यावेळी या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे के डी सी सी बँक संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशरावजी गाडेकर, कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संजय चितारी, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, नगरसेवक सौरभ पाटील,नितीन दिंडे, प्रवीण काळबर, संग्राम गुरव,संग्राम लाड आदी मान्यवर उपस्थित होते.